आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BIG NEWS : विद्या प्रतिष्ठानमध्ये आजपासून तारांगण युवा महोत्सव; विद्यार्थी घेणार शरद पवार यांची मुलाखत

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी  

विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या वतीने प्रथमच तारांगण या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  शुक्रवार दि. ३ व शनिवार दि. ४ मार्च रोजी हा महोत्सव होत आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची विद्यार्थ्यांद्वारे विशेष मुलाखत घेतली जाणार आहे.

विद्या प्रतिष्ठानच्या वार्षिक प्रमुख कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम होण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून या कार्यक्रमाकडे पहिले जात आहे. युवा महोत्सवाची पूर्ण आखणी आणि नियोजन हे संस्थेच्या महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची समिती करत असून त्यांना विद्या प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळाकडून मार्गदर्शन केले जात आहे. 

युवा महोत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी बारामती, माळेगाव, शारदानगर, सोमेश्वर, भिगवण, इंदापूर, दौड, कळंब, सुपे, पुरंदर आदी भागातील वीसपेक्षा अधिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. 

या युवा महोत्सवात दिनांक ३ मार्च रोजी शॉर्ट फिल्म मेकिंग, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, ऑन द स्पॉट पोस्टर मेकिंग, टेक्निकल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, कोडेथॉन आणि डान्स कॉम्पिटिशन अशा स्पर्धा आणि संध्याकाळी रॅप, म्युझिक कॉन्सर्ट, मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, चांडाळ चौकडीचा परफॉर्मन्स आणी फ्रेस्को फॅशन शो इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहेत. 

तसेच दिनांक ४ मार्च २०२३ रोजी गदिमा सभागृहात विद्यार्थ्यांद्वारे घेण्यात येणारी शरद पवार यांची विशेष मुलाखत हे या युवामहोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. तारांगण युवा महोत्सवाचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते होणार आहे.

तसेच या महोत्सवादरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. बारामती, इंदापूर, दौड, फलटण, पुरंदर तालुक्यातील विद्यार्थ्यांना  मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us