बारामती : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्या शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे ६ वाजल्यापासून विकासकामांची पाहणी करून सकाळी १० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात आयोजित जनता दरबारात अजितदादा हजेरी लावणार आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्या बारामतीत असणार आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून ते बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता बारामती मिसळचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १ वाजता बारामती तालुक्यातील तरडोली येथे पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामाचे भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.