आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BIG NEWS : बारामतीत आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा : अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर युवा पॅंथर संघटनेचं आंदोलन स्थगित

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामतीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मागणीसह योजनेशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तविरोधात बारामतीत प्रशासकीय भवनासमोर भारतीय युवा पॅंथर संघटनेकडून आंदोलन सुरू करण्यात आले होते. अखेर योजनेचे जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठकीत गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसह ही योजना प्रभावीपणे राबवली जाईल या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

बारामती शहरातील विविध रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचारांची सुविधा आहे. मात्र लाभार्थ्यांची अडवणूक, आरोग्यमित्रांचे गैरवर्तन असे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर भारतीय युवा पॅंथर संघटनेकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. आज महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा अधिकारी, तहसीलदार आणि आंदोलकांची बैठक झाली.

या बैठकीत महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासह गैरवर्तन करणाऱ्या आरोग्य मित्रांवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात अनिकेत मोहिते, भास्कर दामोदरे, अभिलाष बनसोडे, विनय दामोदर, मंगळदास निकाळजे, जितीन कवडे, कृष्णा साळुंके यांनी सहभाग घेतला.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us