
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शनिवार दि. १३ जानेवारी रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे विकासकामांची पाहणी केल्यानंतर ते सकाळी १०-३० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात होणाऱ्या जनता दरबारासाठी उपस्थित राहणार आहेत. दिवसभरात अजितदादांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार दि. १३ जानेवारी रोजी बारामती दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून ते बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९-३० वाजता काळेनगर येथे सायकल, शिलाई मशीन व साडी वाटप कार्यक्रमाला हजर राहतील.
या कार्यक्रमानंतर सकाळी १०-३० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी अजितदादा नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता मोतीबाग येथील डॉ. माने लाईफलाईन अॅक्सिडेंट हॉस्पिटलचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. तसेच दुपारी ४-३० वाजता डोर्लेवाडी येथील श्रीपाद सराफ या सुवर्णपेढीच्या उदघाटन कार्यक्रमास अजितदादा उपस्थित राहणार आहेत.