
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. अजितदादांच्या उपस्थितीत सकाळी ९.३० वाजता स्वच्छता पंधरवड्यांनिमित्त ‘एक तारीख-एक तास’ हा एक तास श्रमदानाचा उपक्रम राबवला जाणार आहे. तर सकाळी ११.३० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार होणार असून त्यामध्ये अजितदादा नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी ९.४५ वाजता आमराई येथील कविवर्य मोरोपंत शाळेत स्वच्छता पंधरवड्यानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे साधून ‘एक तारीख-एक तास’ उपक्रमांतर्गत एक तास श्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभाग घेणार आहेत.
सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलातील व्हीआयआयटी येथे बारामती आणि दौंड तालुक्यातील शाळांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता अजितदादांचा जनता दरबार होणार असून त्यामध्ये अजितदादा नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेणार आहेत. महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादांचा जनता दरबार होत आहे.
दुपारच्या सत्रात ३ वाजता भिगवण रस्त्यावरील सिद्धीविनायक टाईल्स या दुकानाचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. तर दुपारी ३.३० वाजता अजितदादा भिगवण रस्त्यावरील मलाबार गोल्ड अँड डायमंडस् या ज्वेलरी दुकानाला सदिच्छा भेट देतील. त्यानंतर ४ वाजता वेंकीज चिकन एक्सपिरीयन्स या रेस्टॉरंटचे उदघाटन होणार आहे. तर ५ वाजता बारामती तालुक्यातील तरडोली येथे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत तरडोली पाईपलाईन जोड प्रकल्पाचे उदघाटन ना. अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.