आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BIG NEWS : व्यस्त कार्यक्रमातही कार्यकर्त्यांच्या आग्रहाला अजितदादांनी दिला प्रतिसाद; दुर्गभ्रमंती फाउंडेशनच्या शिवजयंती कार्यक्रमाला लावली हजेरी..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या शिस्तप्रिय आणि कडक स्वभावामुळे ओळखले जातात. वेळेचे काटेकोरपणे पालन करणं ही अजितदादांची खासीयत आहे. मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह न मोडता त्यांना प्रतिसाद दिल्याचेही अनेकवेळा पहायला मिळते. काल बारामतीतही अजितदादांच्या या अनोख्या स्वभावाचं दर्श घडलं. व्यस्त वेळापत्रक असतानाही अजितदादांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाला प्रतिसाद देत दुर्गभ्रमंती फाउंडेशनने आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्याला हजेरी लावत कार्यकर्त्यांविषयी आस्था बाळगण्याचा त्यांचा स्वभाव दाखवून दिला.

रविवारी अजितदादा बारामती दौऱ्यावर होते. पहाटे ६ वाजता बारामती शहरातील कसबा येथे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून अजित पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. भल्या पहाटे बारामतीतील विकासकामांची पाहणी करून त्यांनी शरयू फाउंडेशनने आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला हजेरी लावली. त्यानंतर परतत असताना पंचायत समितीसमोर दुर्गभ्रमंती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी येण्याचा आग्रह केला.

अजितदादांनी या कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत तात्काळ होकारही दिला. दुर्गभ्रमंती फाउंडेशनच्या शिवजयंती सोहळ्याला उपस्थित राहत अजितदादांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. सोबतच दुर्गभ्रमंती फाउंडेशनच्या सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत त्यांनी त्यांच्या कामाबद्दलही माहिती घेतली.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अविनाश बांदल, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे शहराध्यक्ष तुषार लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कावळे, अभिजित घाडगे, सुरज सावंत, चंदू लोंढे, सतीश झारगड, तुषार सावंत, अनिकेत पवार, अक्षय परकाळे, सुरज पिसाळ, सूर्यकांत पिसाळ, नितीन पवार यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच व्यस्त कार्यक्रम असतानाही अजितदादांनी अनपेक्षितपणे दिलेली ही भेट कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी ठरली.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us