आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BIG NEWS : अजितदादा उद्या बारामती दौऱ्यावर; पहाटेपासून विकासकामांची पाहणी, जनता दरबाराचेही आयोजन

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्या रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे साडेसहा वाजल्यापासून अजितदादांच्या दौऱ्याला सुरुवात होणार असून सकाळी १०-४५ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभरात अजितदादा विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावणार आहेत.

रविवारी पहाटे ६-३० वाजता अजितदादा बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. सकाळी ९ वाजता अजितदादांच्या उपस्थितीत शरयू फाउंडेशन आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. सकाळी १० वाजता इंदापूर रस्त्यावरील श्री समर्थ मेडिकल शॉपचे उदघाटन आणि त्यानंतर १०-४५ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार होणार आहे.

दुपारी १ वाजता भिगवण रस्त्यावरील परफेक्ट सलूनचा उदघाटन कार्यक्रम, त्यानंतर १-३० वाजता सूर्यनगरी येथील सॅफ्रोन इन्फ्रा या रहिवाशी व व्यावसायिक संकुलाचे भूमिपुजन होणार आहे. तर दुपारी २-४५ वाजता लेन्सकार्ट शोरुमचे उदघाटन आणि ३ वाजता मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून मंजूर झालेल्या व्यावसायिक कर्ज मंजुरी पत्रक वाटप कार्यक्रमाला अजितदादा उपस्थित राहणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us