बारामती : प्रतिनिधी
मुंबईत शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी केलेल्या हल्ल्यानंतर बारामतीतही गोविंद बाग परिसरात हिंसक आंदोलन करण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याची जबाबदारी एका कर्मचारी महिलेवर देण्यात आली होती. अभिषेक पाटील हा या महिलेच्या सातत्याने संपर्कात होता असेही तपासात उघड झाले आहे.
मुंबईत शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर पोलिस तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा बारामतीतही हिंसक आंदोलन करण्याचा कट होता असे आता तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्वांची जबाबदारी एका कर्मचारी महिलेवर देण्यात आली होती.
सिल्वर ओक हल्ला प्रकरणातील अभिषेक पाटील हा बारामतीतील या महिला कर्मचाऱ्याशी संपर्कात होता. या संदर्भात केलेल्या कटानुसार त्याच्याकडून या महिलेला माहिती देण्याचे काम केले जात होते. त्यामुळे आता ही महिला कर्मचारी कोण याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सिल्वर ओकवरील हल्ल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड होत असतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांचे नागपूर ते बारामती कनेक्शन समोर आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरु असून लवकरच या प्रकरणाचा छडा लागणार आहे.