Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : जालना लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत उद्या दिवसभर कडकडीत बंद; फळे, भाजीपाला मार्केट राहणार बंद, अनेक शाळांनी जाहीर केली सुट्टी..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ उद्या बारामतीत कडकडीत बंद पाळला जाणार आहे. बारामतीतील बाजारपेठ संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार असून बारामती बाजार समितीने फळे आणि भाजीपाला मार्केटही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक शाळांनीही उद्या सुट्टी जाहीर केली आहे.

बारामतीत उद्या सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करण्यात आले आहे. उद्या सकाळी ९ वाजता कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात केली जाणार आहे. कसबा येथून हा मोर्चा गुणवडी चौक, गांधी चौक या मार्गे भिगवण चौकात दाखल होईल. त्या ठिकाणी सांगता सभा होणार असून विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे दिले जाणार आहे.

दरम्यान, बारामती व्यापारी महासंघाने या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर बारामती बाजार समिती व जळोची उपबाजार आवारातील फळे आणि भाजीपाला मार्केटही बंद ठेवण्यात येणार आहे. दुसरीकडे बारामती शहरातील विविध शाळांनी उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर केली आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version