आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BIG BREAKING : बारामतीत रेड बर्ड कंपनीचं शिकाऊ विमान दुसऱ्यांदा कोसळलं; दोनजण जखमी..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामतीतील रेड बर्ड या विमान प्रशिक्षण संस्थेच्या शिकाऊ विमानाला अपघात झाला आहे. आज सकाळी हे विमान कटफळ परिसरातील एका शेतात कोसळल्याची घटना घडली. यामध्ये एक प्रशिक्षक आणि एक प्रशिक्षणार्थी असे दोघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात याच कंपनीचं विमान कोसळलं होतं. त्यानंतर आज पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

बारामती एमआयडीसीत रेड बर्ड नावाची नव्याने वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरु झाली आहे. या कंपनीचं एक शिकाऊ विमान मागील आठवड्यात कोसळलं होतं. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एक विमान कोसळलं आहे. त्यामध्ये एका प्रशिक्षकासह एक प्रशिक्षणार्थी असे दोघेजण जखमी झाले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. विमान कोसळण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. त्यामुळे यामागचं नेमकं कारण काय याबद्दलही उलटसुलट चर्चा होत आहे. या विमानांची तपासणी न करताच उड्डाण केलं जात आहे का असाही सवाल उपस्थित होत आहे.

बारामतीत अनेक भागातील प्रशिक्षणार्थी विमान शिकण्यासाठी येतात. असं असताना अपघाताच्या या घटनांमुळे प्रशिक्षणार्थीमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे या घटनांमागील कारणं शोधून त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us