बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरात सीबीआयने धाड टाकली आहे. बारामतीतील जीएसटी कार्यालयाच्या अधिक्षकाला १० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. थेट सीबीआयने केलेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
बारामती शहरात आज सीबीआयने धाड टाकल्याचे समोर आले आहे. या धाडीत बारामतीतील जीएसटी कार्यालयाच्या अधिक्षकाला १० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
बारामतीतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, सीबीआय थेट बारामतीत अवतरल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.