आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

Big Breaking : दिवसाढवळ्या घरफोडी करून 30 तोळे सोन्याचे दागिने लंपास; बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील घटनेने खळबळ

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी
दिवसाढवळ्या घराची कुलूपे तोडून जवळपास २८ ते ३० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथे घडली. शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे कऱ्हावागज परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, कऱ्हावागज येथील मच्छिंद्र जानकर आणि गोरख बनकर हे सख्खे भाऊ शेजारी शेजारी राहतात. घरातील सर्व लोक हरभरा तूर खुरपण्यासाठी शेतात गेली होती. मच्छिंद्र बनकर घरी होते मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेळ्यांना चारा आणण्यासाठी ते देखील रानात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 15 तोळ्या पेक्षा जास्त दागिने चोरून नेले. घरासमोरच राहणारे त्यांचे भाऊ गोरख बनकर यांच्या देखील घराचे कुलूप कटावणीने उचकटून तीन गंठण, अंगठ्या, राणीहार, सोनसाखळ्या असा जवळपास 18 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. गोरख आणि मच्छिंद्र जानकर यांचे दोघांचे मिळून जवळपास 28 ते 30 तोळे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी आहेत. दोघेही बंधू टेलिफोन खात्यातून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मिळालेल्या पैशातून त्यांनी सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक केली होती.
मात्र, दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडी करत सर्व सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. यासंदर्भात घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्यासह पोलिस पथकाने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पडताळणीचे काम सुरू आहे. याप्रकरणी फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आल्याची माहिती महेश ढवाण यांनी दिली.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us