
बारामती : प्रतिनिधी
माझ्यावर खरंच प्रेम असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून ते व्यक्त करा असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत डिड्स फॉर नीड्स आणि दुर्गभ्रमंती ग्रूपकडून १ हजार झाडांचे वाटप करण्यात येणार आहे. आज या उपक्रमाची सुरुवात सावंतवाडी येथून करण्यात आली.
बारामतीच्या विकासासाठी गेली ३० वर्षे आपण प्रयत्न करत आहोत. याचा मोबदला द्यायचा असेल आणि माझ्यावर खरंच प्रेम असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करा असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत डिड्स फॉर नीड्स आणि दुर्गभ्रमंती ग्रूपने १ हजार झाडांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाची आज सावंतवाडी येथे सुरुवात करण्यात आली. यावेळी डिड्स फॉर नीड्सच्या संचालिका संगीता सक्सेना, प्रिया कपाडिया यांच्यासह दुर्गभ्रमंती ग्रूपचे सदस्य उपस्थित होते. अजितदादा नेहमीच वृक्षारोपणावर भर देत असतात. त्यातूनच हरीत बारामती निर्माण होत असून यामध्ये हातभार लावण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत असून त्यातून प्रत्येक कुटुंबाला २० याप्रमाणे १ हजार झाडांचे वाटप केले जाणार आहे.