बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय रामभाऊ आवाळे यांची, तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब चंदरराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुचनेनुसार ही निवड करण्यात आली.
बारामती तालुका खरेदी-विक्री संघाची २०२२-२७ या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली होती. त्यानंतर आज अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडही बिनविरोध करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुचनेनुसार अध्यक्षपदी दत्तात्रय आवाळे व उपाध्यक्षपदी बाळासाहेब मोरे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली.
आजच्या निवडीत दोघांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदिप जगताप, धनवान वदक, तानाजी खोमणे, दशरथ धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करत त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.