बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात सध्या बिघाड झाला असून सध्या पाणीसाठाही अपुरा आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार दि. १४ जानेवारी आणि सोमवार दि. १६ जानेवारी रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मात्र रविवारी दि. १५ जानेवारी रोजी पाणीपुरवठा केला जाणार असून मंगळवार दि. १७ जानेवारीपासून दैनंदिन पुरवठा होणार असल्याचे बारामती नगरपरिषदेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
बारामती शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाला आहे. त्यामुळे या केंद्राचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यातच सद्यस्थितीत पाणीसाठा अपुरा आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांसाठी पाण्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार उद्या शनिवार दि. १४ आणि सोमवार दि. १६ जानेवारी रोजी पाणीपुरवठा होणार नाही. मात्र रविवारी दि. १५ जानेवारी रोजी पाणीपुरवठा केला जाणार आहे.
मंगळवार दि. १७ जानेवारीपासून नियमीत पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.