आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BARAMATI BREAKING : दूधाच्या दरवाढीच्या मागणीसाठीचं तरडोलीतील युवा शेतकऱ्याचं उपोषण अखेर मागे; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण घेतलं मागे..

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

दूधाला दरवाढ मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी बारामती तालुक्यातील तरडोली येथील सागर जाधव या शेतकऱ्याने सुरू केलेलं उपोषण अखेर आज मागे घेतलं आहे. तहसीलदार गणेश शिंदे यांनी त्यांच्या मागण्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आणि तालुका पातळीवरील समस्यांवर तात्काळ मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आज सातव्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

बारामती तालुक्याच्या जिरायत भागात पाण्याची नेहमीच टंचाई जाणवत असते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाला अधिकचे महत्व दिले आहे. मागच्या काळात दूधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. त्यामुळे तरडोली येथील युवा शेतकरी सागर जाधव यांनी उपोषण सुरू केलं होतं. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती.

दरम्यानच्या काळात तरडोली ग्रामस्थांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. आज तहसीलदार गणेश शिंदे यांनी उपोषणकर्ते सागर जाधव यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच इतर मागण्या स्थानिक पातळीवर तात्काळ सोडवल्या जातील अशी ग्वाही दिली. तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते सरबत पिऊन सागर जाधव यांनी आपले उपोषण मागे घेतले.

यावेळी पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे, पंचायत समितीचे माजी सदस्य  राहुल भापकर, सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, माजी सरपंच नवनाथ जगदाळे, महेंद्र तांबे, सतीश गायकवाड, अश्विनी गाडे, स्वाती गायकवाड, अनिल कदम, शरद भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, ३० ऑक्टोबरपर्यंत दूधाच्या दरात वाढ व्हावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्ते सागर जाधव आणि उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता शासनाकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us