आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BARAMATI BREAKING : सायंबाचीवाडी राडा प्रकरण; दोन्ही गटातील अटक आरोपींना बारामती न्यायालयाने केला जामिन मंजूर

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर दोन गटात राडा झाला होता. त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ३५ जणांना अटक केली होती. आज बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने या सर्वांना जामिन मंजूर केला आहे. आरोपींच्या अटकेवर वकिलांनी आक्षेप घेत युक्तीवाद केल्यानंतर हा जामिन मंजूर करण्यात आला.

काल सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या मतमोजणीनंतर गावात देवदर्शनासाठी जाताना दोन गटात राडा झाला होता. त्यामध्ये एकमेकांवर दगडफेकीसह वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दुर्योधन भापकर, साहेबराव भापकर, गौरव भापकर, निखील भापकर, आदित्य भापकर, हर्षद भापकर, मयुर भापकर, विजय भापकर केशव भापकर, दिपक भापकर, विकास अभंग, नानासो भापकर, सुरज जगताप, वैभव भापकर, मंथन भापकर, सौरभ घाडगे, यश भापकर, प्रविण जगताप, यश जगताप,भरत आंधळे, ऋषिकेश जगताप, वैभव जगताप, हणुमंत भगत, विकास जगताप, श्रीकांत भापकर, मेघराज, जगताप, रघुनाथ भगत, सुभाष जगताप, मयुर जगताप, प्रतिक जगताप, मंगेश जगताप, प्रणव जगताप, शतायु जगताप, दिलीप जगताप, प्रमोद जगताप, निलेश जगताप यांच्यासह ५० ते ६० इतर अशा ९६ जणांवर गुन्हा दाखल केला होता.

यातील ३५ आरोपींना अटक करुन आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपींच्या वतीने ॲड. राजेंद्र काळे आणि ॲड. रणजीत गावडे यांनी जोरदार युक्तीवाद करत आरोपींची अटक बेकायदेशीर असल्याचे सिद्ध केले. त्याचबरोबर वाढीव कलम लावताना पोलिसांकडून कायद्याचं पालन झालं नसल्याचेही न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात आले. त्यामुळे न्यायालयाकडून पहिल्याच दिवशी सर्व आरोपींना जामिन मंजूर करण्यात आला.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us