Site icon Aapli Baramati News

BARAMATI BIGGEST BREAKING : बारामती शहरात एकाच रात्रीत ८ ते ९ घरांवर दरोडा; मोठ्या प्रमाणात ऐवज केला लंपास, धक्कादायक घटनेनं बारामती हादरली..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील देसाई इस्टेट, अशोकनगर आणि क्रीडा संकुल भागात काल रात्री जवळपास ८ ते ९ घरांवर दरोडा पडला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर बारामती शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामती शहरातील देसाई इस्टेट, अशोकनगर आणि क्रीडा संकुल परिसरात काल रात्री अज्ञात दरोडेखोरांनी सलग ८ ते ९ घरांवर दरोडा टाकला आहे. त्यामध्ये अनेक घरामधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बारामतीत प्रथमच अशा स्वरूपाची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाचवेळी एवढ्या घरांवर दरोडा पडण्याची बारामतीच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचवेळी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version