Site icon Aapli Baramati News

BARAMATI BREAKING : बारामतीच्या सुर्यनगरीत लहान बाळाचं मुंडकं आढळलं; शहरात उडाली खळबळ..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील सुर्यनगरी परिसरात काटेरी झुडपात एका लहान बाळाचं मुंडकं आढळून आलं आहे. आज सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ मुंडकं आढळल्यानं खळबळ उडाली असून बारामती तालुका पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

बारामती शहरातील सुर्यनगरी येथे आज सायंकाळी काही नागरीकांना हे मुंडकं आढळून आलं. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह वरीष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल होत अधिक माहिती घेतली.

धडाशिवाय केवळ मुंडकं आढळल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हे बाळ स्त्री जातीचे असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, हा प्रकार नेमका काय आहे याचा शोध घेण्याचं आव्हान बारामती तालुका पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. धागेदोरे हाती लागल्यानंतरच यामागील सत्य समोर येणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version