आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

अन अजितदादांनी ताफा थांबवत केली अपघातग्रस्तांना मदत..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे जितके शिस्तप्रिय तितकेच हळवे आहेत. याची अनेकदा प्रचिती येत असते. आजही माळेगाव येथील कार्यक्रम उरकून बारामतीकडे जात असताना माळेगाव कॉलनी येथे अपघात झाल्याचं दिसताच अजितदादांनी ताफा थांबवत अपघातग्रस्तांना मदत केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी संबंधित रुग्णालयात उपचाराबाबत सुचना दिल्या.

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे आयोजित कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुढील कार्यक्रमासाठी बारामतीला जात होते. माळेगाव कॉलनीदरम्यान एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ ताफा थांबवत संबंधित जखमी व्यक्तीला आपल्या ताफ्यातील वाहनातून बारामतीतील खासगी रुग्णालयात पोहोचवलं.

यानंतर अजितदादांनी तात्काळ संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधत उपचारासंबंधी सुचना केल्या. दत्तात्रय आवाळे (रा. किकवी, ता. भोर) असे या अपघातग्रस्त व्यक्तीचं नाव आहे. ते आपल्याला मुलीला नेण्यासाठी सणसरजवळ आले होते. तेथून परतत असताना त्यांचा अपघात झाला.

बारामतीत आज अजितदादांचे अनेक कार्यक्रम आहेत. मात्र त्यातूनही त्यांनी आपला ताफा थांबवत अपघातग्रस्तांना मदत केली. त्यामुळंच अजितदादांना ‘माणूस जीवाभावाचा’ म्हटलं जातं याचाच प्रत्यय आला.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us