Site icon Aapli Baramati News

सुप्रियाताईंचा विनामास्क कार्यकर्त्यांना टोला; नियमांच्या पालनावरून अजितदादांचं कौतुक..!

ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

कोरोनाबद्दल अजूनही गंभीर नसल्याचे पाहून खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे. जो कार्यकर्ता किंवा सदस्य विनामास्क दिसेल त्याला तिकीटच देऊ नका अशा सूचना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना केल्या आहेत. दुसरीकडे अजितदादांच्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सवयीचेही त्यांनी कौतुक केले.

इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, रस्ते अस्तरीकरण, सोलर सिस्टीम आदी विकासकामांचा लोकार्पण सोहळा आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रताप पाटील, अभिजीत तांबीले, सरपंच रोहिणी सोनवणे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या दिड वर्षात किती लोकांनी अजितदादांचा चेहरा पाहिला..? सगळे काही अजितदादांचं ऐकता, मग कोरोना नियमांचे पालन का करत नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विनामास्क कार्यकर्त्यांना विचारला. यापुढे जर तीनवेळा कोणाचा विनामास्क फोटो आला तर त्याला तिकीटच देऊ नका असे सांगत नो मास्क, नो तिकीट अशी सुचनाच त्यांनी जिल्हाध्यक्षांना केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version