आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BIG NEWS : रविवारी अजितदादा बारामतीत; विविध कार्यक्रमांचे आयोजन, अजितदादांच्या उपस्थितीत होणार जनता दरबार..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते अजित पवार हे रविवार दि. १८ जून रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. रविवारी सकाळी ६ वाजता एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित हॅप्पी स्ट्रीटस बारामती या उपक्रमाचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. तर सकाळी ८.३० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबाराचे आयोजन केले जाणार आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे रविवारी बारामतीत येत आहेत. सकाळी ६ वाजता एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित हॅप्पी स्ट्रीटस बारामती या उपक्रमात अजितदादा सहभाग घेणार आहेत. तर सकाळी ७.३० वाजता बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी २.३० वाजता बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया बारामती शाखेच्या पदग्रहण समारंभास अजितदादा उपस्थित राहतील. त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला भेट देऊन ते पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us