आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BARAMATI BREAKING : ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी १२ अर्ज, सर्वाधिक अर्ज वाघळवाडीतून..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

राज्यात ग्रामपंचयात निवडणुकीच्या रणधूमाळीला सुरुवात झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी आज पहिल्याच दिवशी १२ अर्ज दाखल झाले. आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक अर्ज वाघळवाडीतून दाखल झाले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ चा  कार्यक्रम जाहीर केला असून १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बारामती तालुक्यात एकूण १३ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये मोरगाव, वाघळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गरदडवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी व  पळशी अशा एकूण १३  ग्रामपंचायतीत  सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

२८ नोव्हेंबर  ते २ डिसेंबर २०२२  या कालावधीत सकाळी  ११.००  ते दुपारी ३.००  वाजेपर्यंत तहसिल कार्यालय, बारामती येथे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर त्याची संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहे.

आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये सरपंचपदासाठी मोरगाव येथील २, वाघळवाडीचे ४, व पणदरे येथील २ आणि सदस्यपदासाठी मोरगाव येथील १ व  पणदरे येथील ३ असे एकूण १२ अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us