बारामती : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्या बारामती दौऱ्यावर येत आहेत. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात अजितदादांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांसह सोमेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि शेतकरी मेळावा होणार आहे. तर दुपारी माळेगाव साखर कारखान्याच्याही गळीत हंगामाची सुरुवात अजितदादांच्या हस्ते मोळी टाकून केला जाणार आहे.
रविवारी सकाळी ७-४५ वाजता वाघळवाडी येथील तिरूपती बालाजी अॅग्रो प्रोडक्टच्या विस्तारीत प्रकल्पाचे उदघाटन, ८-४५ वाजता शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनियरींग इमारत उदघाटन, ९ वाजता सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुलींच्या वसतीगृहाचे उदघाटन, ९-१५ वाजता शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इमारत उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी ९-४५ वाजता सोमेश्वर कारखान्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन, १० वाजता सोमेश्वर कामगार पटपेढी व वाचनालयाच्या इमारतीचे उदघाटन, १०-३० वाजता सोमेश्वर कामगार वसाहतीचे उदघाटन, ११ वाजता सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमीपूजन, ११-१५ वाजता सोमेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि ११-३० वाजता गळीत हंगामानिमित्त शेतकरी मेळावा होणार आहे.
दुपारी २-३० वाजता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.