बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील प्राचीन सिद्धेश्वर मंदिरात आज सोमवार (दि.१) रोजी पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त बारामती तालुका व शहरातील भाविकांनी सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षे श्रावणात देखील मंदिरे दर्शनासाठी बंद होती यंदा मात्र शासनाने सर्व नियम शिथिल केल्याने आज मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली सोमवारी मंदिराच्या विश्वस्थानी पहाटे अभिषेख केल्यावर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तर भाविकांनी पिंडीचे दर्शन व अभिषेक करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने वाणी समाजाचा मान असल्याने ग्रामदैवताची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा घालून पालखी पुन्हा सिद्धेश्वर मंदिरात आणली जाईल. रात्री दहा वाजता शेज आरती होणार असुन शासनाने मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यास परवानगी दिल्याने मंदिराचे प्रमुख विश्वस्त समीर दाते यांनी आभार मानले.