आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

Big Breaking : ‘वीर’ मधून नीरा नदीत ६ हजार ११८ क्युसेक्सने विसर्ग; धरण ९३.२० टक्के भरले

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

नीरा : प्रतिनिधी

पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील  वीर धरणाच्या  विद्युतगृहातून शुक्रवारी (दि.१५) १ हजार ७०० क्युसेक्स व एका दरवाजातून ४ हजार ४१८ क्युसेक्स असे ६ हजार ११८ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आल्याची माहिती वीर धरण विभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली.

शुक्रवारी ( दि.१५) सकाळी सहा वाजलेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत पावसाची आकडेवारी घेतली असता

नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेञात ३८ मि.मी, भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेञात ७ मि.मी तर गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेञात ४३ मि.मी.पाऊस पडला. या पाण्याची आवक वीर धरणात झाली. त्यामुळे वीर धरण शुक्रवारी ( दि.१५) दुपारी चार वाजता ९३.२० टक्के भरले.

परिणामी शुक्रवारी ( दि.१५) सकाळी साडेदहा वाजता वीर धरणावरील नीरा उजव्या कालव्याच्या विद्युतगृहातून १ हजार ४०० क्युसेक्सने व नीरा डाव्या कालव्याच्या विद्युतगृहातून ३०० क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने

विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला. तसेच दुपारी दोन वाजता वीर धरणाच्या एका दरवाजातून ४ हजार ४१८ क्युसेक्स असे एकूण ६ हजार ११८ क्युसेक्स प्रतिसेकंदाने विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला.तसेच गुंजवणी धरणाच्या विद्युतगृहातून २५० क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी दिली.

शुक्रवारी ( दि.१५) दुपारी चार वाजेपर्यंत नीरा खोऱ्यातील पाणी साठ्याची आकडेवारी

अ.नं.      धरण        उपयुक्त पाणीसाठा      टक्केवारी                         

(टीएमसी)                     %

१)      नीरा देवघर       ५.०३८                   ४२.९५

२)      भाटघर           ११.५६५                   ४९.२१

३)        वीर               ८.७६७                    ९३.२०

४)      गुंजवणी          २.५३१                    ६८.६०


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us