आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडले योग शिबिर

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

येथील विद्या प्रतिष्ठान आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने योगदिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि.२१जुन) रोजी योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्राध्यापक, विद्यार्थी व‌ नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

फोरमच्या प्रमुख सौ.सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी योग दिनाचे औचित्य साधून एन्व्हॉर्यमेंटल फोरम व विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले जाते.

योगाचार्य डॉ. नीलेश महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्या प्रतिष्ठानमधील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी तसेच फोरम सदस्य यांना योगाचे धडे दिले. या प्रसंगी त्यांनी योगसाधनेबाबत महत्वपूर्ण माहिती देत नियमीत योगसाधना करण्याचे आवाहन केले. 

या प्रसंगी  विद्या प्रतिष्ठानचे रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्या हस्ते डॉ. नीलेश महाजन यांचा सत्कार करण्यात आला.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us