बारामती : प्रतिनिधी
२०१७ साली झालेल्या पोलिस पाटील पद भरतीमध्ये जन्म तारखेचा बोगस दाखला दिल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील कानाडवाडी येथील विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर या महिलेवर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१७ साली राज्य शासनाच्या माध्यमातून पोलिस पाटील पदाची भरती करण्यात आली. या भरतीमध्ये कानाडवाडी येथील विद्या कोळेकर यांनीही सहभाग केला होता. यात त्यांनी जन्मतारखेचा चुकीचा आणि खोटा दाखला देत शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार मंडल अधिकारी महंमद पापा सय्यद यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सय्यद यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या प्राधिकृत पत्रानुसार सय्यद यांनी फिर्याद दाखल केली. बारामती शहर पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.