
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील बाबूर्डी येथील कऱ्हा नदीवरील ढोपरेमळा बंधारा आणि साळोबा डोह बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून १ कोटी २० लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे, जेष्ठ मार्गदर्शक रामभाऊ ढोपरे, हौशिराम पोमणे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष नानाभाऊ लडकत, आण्णा तात्या लव्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
ढोपरेमळा येथील बंधारा दुरूस्ती साठी ८१ लाख ६९ हजार रुपये, तर साळोबाडोह बंधारा दुरूस्तीसाठी ३८ लाख ५१ हजार रूपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. मागील वेळी कऱ्हा नदीला आलेल्या पुरामूळे बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या निधीतून हे दोन्हीही बंधारे दुरुस्त केले जाणार आहेत.
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, उपसरपंच दिपाली जगताप, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढोपरे, मनिषा बाचकर, बाबुर्डी सोसायटीचे चेअरमन शांताराम ढोपरे, लक्ष्मण पोमणे, माजी सरपंच अंकुश लडकत, दिलीप पोमणे, राजकुमार लव्हे, संतोष पोमणे, गोरख खोमणे, गोविंद बाचकर, हनुमंत गायकवाड, भाऊसाहेब ढोपरे तसेच पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.