
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर पुष्पक बुलियन प्रकरणातून ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईत त्यांच्या ६.४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. त्यात ११ सदनिकांचा समावेश आहे. याच मुद्द्यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता उद्धव ठाकरे यांची रात्रीचीही झोप उडणार असल्याचा थेट इशाराच सोमय्या यांनी दिला आहे.
ईडीकडे मी गेल्या दीड वर्षांपासून पाटणकरांच्या कारनाम्यासंदर्भात पाठपुरावा करत आहे. त्यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेचे कंत्राट आहे. त्यामुळे त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे. ३० कोटींचा घोटाळा झाला असल्याची माहिती ईडीने दिली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोप उडणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला.
हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझे हे वाक्य संपल्यानंतर लगेच ठाकरेंची माफिया सेना बोंबाबोंब सुरु करतील. यापूर्वीही त्यांना मी अन्वय नाईक यांचा संबंध काय असा सवाल उपस्थित केला असल्याचे त्यांनी सांगितले.