आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

प्रदीर्घ कालावधीनंतर शरद पवार माळेगाव कारखान्यावर; कामकाजाची घेतली माहिती..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

माळेगाव कारखाना म्हटले की ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव पुढे येते. मात्र शरद पवार यांनी काही कारणास्तव या कारखान्यावर जाणे टाळले होते. आज प्रदीर्घ कालावधीनंतर शरद पवार यांनी माळेगाव कारखान्यावर जाऊन कामकाजाची माहिती घेतली.

माळेगाव कारखान्यावर अपवाद वगळता राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वास्तव्यही माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे. त्यामुळे माळेगाव कारखाना आणि शरद पवार यांच्यातील ऋणानुबंध नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत.

२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत माळेगाव कारखान्यांवरील राष्ट्रवादीची संपुष्टात आली आणि चंद्रराव तावरे यांच्याकडे सत्तासूत्रे गेली. तत्पूर्वी माळेगाव कारखाना ऊसदराच्या आंदोलनांमुळे चर्चेत राहिला. त्यामुळे तब्बल ११ वर्षे शरद पवार यांनी माळेगाव कारखान्यावर एकदाही भेट दिली नव्हती. परिणामी शरद पवार यांना सत्ता आल्यानंतरच सन्मानाने पुन्हा कारखान्यावर आणायचे असा चंग राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बांधला होता.

२०२० साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सत्ता हस्तगत केली. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी शरद पवार हे माळेगाव कारखान्यावर आले. त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि संचालक मंडळाकडून कारखान्याच्या कामकाजाची माहिती घेत काही सूचनाही दिल्या.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us