आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारण

हा अर्थसंकल्प नव्हे.. हा तर निवडणूक संकल्प : जयंत पाटील यांची टिका

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी, हा अर्थसंकल्प नव्हे ! निवडणूक संकल्प असे ट्विट करत निशाणा साधला आहे. 

देशामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका चालू आहेत. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हा अर्थसंकल्प नाही. हा निवडणूक संकल्प आहे. 

दोन वर्षापासून कोरोना जागतिक महामारीचे संकट असल्यामुळे या संकटातून सावरत देशासह जागतिक अर्थव्यवस्थेसमोर उभे राहण्याचे आव्हान केंद्र सरकारसमोर आहे.  देशाला उभारी मिळण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले होते.

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us