आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारण

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात बारामतीत राष्ट्रवादीचे आंदोलन

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती: प्रतिनिधी

केंद्र सरकारने जनतेला खोटी आश्वासने व मोकळ्या थांबून थापा मारून गेल्या सात वर्षापासून संपूर्ण भारत देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावलेली आहे. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेशी असंवेदनशीलपणे वागणाऱ्या या सरकारला जनताच जागा दाखवून देईल, असे मत बारामती तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी व्यक्त केले.

बारामतीत आज प्रशासकीय भवनासमोर राष्ट्रवादीच्या वतीने इंधर दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी इम्तियाज शिकीलकर, विश्वासराव देवकाते, बाळासाहेब तावरे, मदन देवकाते,  प्रमोद काकडे , नीता फरांदे, पौर्णिमा तावरे, रोहित कोकरे, प्रशांत काटे, शिवाजीराव टेंगले, संदीप जगताप, वसंत गावडे, धनवान वदक, राजवर्धन शिंदे, राहुल वाबळे, अमर धुमाळ, वनिता बनकर, अनिता गायकवाड, पोपटराव पानसरे, संजय भोसले, अनिल खलाटे, अॅड. अविनाश गायकवाड, रवींद्र माने, तुषार कोकरे, राहुल कदम, साधू बल्लाळ, सुनिल बनसोडे, आरती शेंडगे, भाग्यश्री धायगुडे, मिलिंद मोरे, सुचिता साळवे, दिपाली पवार, शबीर शेख आदींसह सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्य जनतेचे जीवन आर्थिक दृष्ट्या हतबल केले आहे. या सर्व बाबींमुळे कधी नव्हती एवढी महागाई प्रत्येक गोष्टींमध्ये वाढलेली आहे अशा परिस्थितीत सामान्य जनता बेचेन झालेले आहे. नवीन रोजगार निर्मिती न करता लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारची करवाढ लावून प्रचंड दरवाढ करून गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास काढण्याचे महापाप या सरकारने केले असल्याचेही संभाजी होळकर यांनी नमूद केले.

तसेच सततच्या वाढत्या महागाईमुळे  केंद्र सरकारचा  उपस्थितांनी निषेध व्यक्त केला. डिझेल व घरगुती गॅस दरवाढ कमी करावी अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us