आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मराठवाडामहानगरेमहाराष्ट्रराष्ट्रीय

कॉफी पडली महागात..! कॉफी शॉपमधून ९ मुली आणि ६ मुलं पोलिसांच्या ताब्यात

मराठवाडा
ह्याचा प्रसार करा

नांदेड : प्रतिनिधी

अलीकडील काळात प्रेमी युगुलांसाठी कॉफी शॉप ही हक्काची जागा बनली आहे. मात्र नांदेडमध्ये प्रेमी युगुलांना कॉफी चांगलीच महागात पडली आहे. नांदेड शहरातील आनंदनगर भागातील कॉफी शॉपमधून पोलिसांनी ९ मुलीसह ६ मुलांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी राज मॉल येथील कॉफी शॉपवर धाड टाकली होती. यावेळी अश्लिल चाळे करणाऱ्यांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नांदेड शहरात अनेक भागात विद्यार्थ्यांची वर्दळ असते. अशा वर्दळ असलेल्या भागात असंख्य कॉफी शॉप आहेत. बाबानगर, आनंदनगर, भाग्यनगर, कैलासनगर, श्यामनगर परिसरात ही दुकाने आहेत. कॉफी शॉप, नेट कॅफे, लंच पाँईटच्या नावाने दुकाने उघडण्यात आली आहेत. यामधील अनेक दुकानदारांनी आतील बाजूने अंधारमय खोली करून बसण्याची व्यवस्था केली आहे. बाहेरुन जाणाऱ्यांना आतील काहीही दिसत नाही. त्याचबरोबर काही ठिकाणी मुला-मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

राज मॉलमधील एका कॉफी शॉपमध्ये पोलिसांनी धाड टाकल्यानंतर तिथे विचित्र प्रकार उघड झाला. कॉफी शॉपमध्ये बसलेली मुले-मुली अश्लील चाळे करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी ९ मुलींसह ६ मुलांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज मॉल येथील कॉपी शॉपच्या मालकासह दोघांवर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरात छेडछाडीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी दिली आहे.


ह्याचा प्रसार करा
मराठवाडा
Back to top button
Contact Us