बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. २ जून रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ते नेहमीप्रमाणे शहर आणि परिसरातील विकासकामांना भेटी देणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता सहयोग निवासस्थानी अजितदादांच्या उपस्थितीत जनता दरबार होणार आहे.
रविवारी अजितदादा बारामती दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ६ वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. सकाळी ते बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता सहयोग निवासस्थानी अजितदादांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अजितदादा नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.
दुपारी १२ वाजेपर्यंत हा जनता दरबार होणार आहे. त्यानंतर अजितदादा आपल्या पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. दरम्यान, अजितदादा हे बारामती दौऱ्यावर आल्यानंतर जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत असतात. त्यामुळे बारामतीत होणाऱ्या जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी होत असते.