बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. २१ जानेवारी रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे ६ वाजल्यापासून ते बारामती शहर आणि विकासकामांची पाहणी करणार आहेत. सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार पार पडणार असून या ठिकाणी अजितदादा कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवार दि. २१ जानेवारी रोजी बारामती दौरा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पहाटे ६ वाजल्यापासून अजितदादा बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांना भेटी देणार आहेत. सकाळी १० वाजता मएसो क्रीडा करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अजितदादांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान, अजितदादा कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतील. त्यानंतर दुपारी १२-४५ वाजता अजितदादा आपल्या पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.