आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

बारामती शहरात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात; नागरिकांनी केलं अभिवादन

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,पहिल्या स्त्री शिक्षिका महामाता सावित्रीमाई फुले यांची जयंती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक याठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.

महामाता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि महामाता सावित्रीमाई फुले यांच्या क्रांतिकारी कार्याचे स्मरण करत माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे,शुभम अहिवळे,सोमनाथ लोंढे,किरण भोसले यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितींना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी नगरसेवक गणेश सोनवणे,रोहित बनकर,गौतम शिंदे,सोमनाथ रणदिवे,अक्षय माने,राहुल काळे,अजय माने,पार्थ ढोबळे,विशाल जावीर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बबलू जगताप यांनी केले.


ह्याचा प्रसार करा
बारामती

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us