बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे ६ वाजल्यापासून अजितदादा बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. तर सकाळी १० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात होणाऱ्या जनता दरबारात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी बारामती दौरा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ६ वाजता हा दौरा सुरु होणार असून अजितदादा बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करून आढावा घेणार आहेत. सकाळी १० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी अजितदादा उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
दुपारच्या सत्रात २ वाजता ओमसाई इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कार्यालयाचं उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. २.३० वाजता सातव चौकातील साई लॅबोरेटरीचे उदघाटन होईल. त्यानंतर ३.३० वाजता भवानीनगर येथील चिंतामणी मल्टीसपेशालिटी हॉस्पिटलचं उदघाटन होणार आहे.