Site icon Aapli Baramati News

Big Breaking : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट; अतिवृष्टीग्रस्तांबाबत केल्या `या´ मागण्या..!

ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram

मुंबई : प्रतिनिधी 

विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार, फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत द्यावी. अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. घरे आणि दुकानांत पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी. अतिवृष्टीनं झालेलं शेतजमीन व पिकांचं नुकसान लक्षात घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलवावे आदी मागण्यांचे निवेदन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मंत्री छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, आमदार सर्वश्री अनिल पाटील, नितीन पवार, सुनील भुसारा आदी मान्यवरांचा समावेश होता.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकताच विदर्भ, मराठवाड्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त गावांचा दौरा करुन स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, अधिकारी व जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीची तसेच आवश्यक उपाययोजनांची माहिती घेतली. त्यासंदर्भातील सविस्तर निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले. या निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला पुरस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देतानाच आवश्यक उपाययोजनाही सुचवल्या आहेत. 

राज्यामध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणेकरीता मी विदर्भ व मराठवाडा या विभागाचा दिनांक 28ते 31 जुलै दरम्यान दौरा केला आहे.  सदरच्या दौऱ्याचे वेळी प्रामुख्याने पुढील बाबी निदर्शनास आल्या आहेत.  तरी त्यावर त्वरीत कार्यवाही करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.

सरकारने गांभीर्याने व साकल्याने विचार करुन अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणेबाबत तात्काळ कार्यवाही करावी, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram
Exit mobile version