Site icon Aapli Baramati News

…तर तुमच्या छाताडावर बसून पुढे जाऊ : संजय राऊत यांचा इशारा

ह्याचा प्रसार करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबादमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाईविरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी संजय राऊत यांनी पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवरून केंद्रावर निशाणा साधला. राज्यामध्ये दंगली घडवण्याचे कटकारस्थान चालू आहेत. तुम्ही कितीही कटकारस्थान रचा, मात्र आम्ही तुमच्या छाताडावर बसून पुढे जाऊ, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

औरंगाबादमध्ये झालेल्या मोर्चाला संबोधित करताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, आज देशामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी आपल्याला एकत्रित येणे गरजेचे आहे. केंद्र शासन चुकीचे धोरण आखत आहे. या धोरणामुळे देशात आतापर्यंत १७ हजार व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. केंद्र शासनाची ही एक प्रकारची निजामशाही आहे. महागाई ही राष्ट्रीय समस्या बनली आहे. मोदी सत्तेत येण्यापूर्वी सहा महिन्यात महागाई कमी करू असे म्हटले होते. त्याचे काय झाले? असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

पेट्रोलचे दर अजूनही शंभरी पलीकडे आहेत. केंद्र शासनाने पेट्रोलचे दर ५० रुपयांनी कमी करावेत. राज्य शासनही पेट्रोलचे कर कमी करेल असेही त्यांनी नमूद केले.  भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नेत्यांना धमकावण्याचे कट कारस्थान रचले जात आहे. मात्र तुम्ही कितीही कटकारस्थान रचा, आम्ही  तुमच्या छाताडावर बसून पुढे जाऊ, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

शिवसेना हा पक्ष बिल्डर आणि शेटजींचा नसून हा पक्ष कामगार आणि श्रमिकांचा आहे. मात्र सध्या भाजपाकडून या श्रमिकांचे डोके काम भडकवण्याचे काम चालू आहे असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version