नवी दिल्ली: वृत्तसंस्था
भाजप नेते आणि केंद्रीय नितीन मंत्री नितिन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे भाजप आणि मनसेची युती होणार अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
जोपर्यंत राज ठाकरे हे परप्रांतियांच्या धोरणात बदल करत नाहीत तोपर्यंत भाजपा आणि मनसेची युती शक्य नाही. शिवसेनेनं हिंदुत्व सोडले आहे असे आम्हाला वाटत होते. परंतु राज ठाकरे हेदेखील त्याच दिशेने जात आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणाचा अंदाज घेतला तर घरातूनच आवाज उठायला लागला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दानवे यांनी केलेल्या युतीबाबतच्या स्पष्टीकरणावरून भाजप आणि मनसे युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच राज ठाकरे आणि माझी भेट होणार आहे. ही भेट एका वेगळ्या विषयावर आहे. राजकीय विषयावर ही भेट होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.