Site icon Aapli Baramati News

…तरीसुद्धा काश्मिरी पंडितांची घरवापसी का होऊ शकली नाही : संजय राऊत यांचा सामनातून सवाल

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

नुकताच प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावरून भाजप आणि विरोधकांमध्ये संघर्ष पहायला मिळत आहेत. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कलम ३७० चा संदर्भ देत सामनामधून टीका केली आहे.

लेह लडाखला काश्मिरमधून वेगळे करत काश्मीरला केंद्रशासित राज्य बनवले. तेथील विधानसभा आणि लोकसभा मदारसंघांच्या पुनर्रचनेचे काम आता संपले आहे. या पद्धतीने जम्मू प्रांतातील विधानसभेच्या जागा वाढून तेथे हिंदूच मुख्यमंत्री होईल. नव्वदच्या दशकात परागंदा झालेल्या काश्मिरी पंडितांची घरवापसी हा मोदी सरकारचा कार्यक्रम होता. कलम ३७० हटवलं तरीसुद्धा काश्मिरी पंडितांची घरवापसी  का होऊ शकली नाही?  हे अपयश कोणाचे आहे? असे सवाल संजय राऊत यांनी पस्थित केले आहेत.

‘द काश्मीर फाईल्स’ यांसारखे अनेक चित्रपटांची निर्मिती व्हायला पाहिजे. परंतु राजकीय विरोधकांबाबत द्वेष आणि भ्रम पसरवणे असा या चित्रपटांचा अजेंडा आहे. द ताश्कंद फाईल्सची निर्मितीदेखील याच चित्रपटाच्या निर्मात्याने केली. त्यातसुद्धा एका ठराविक गटाचा अजेंडा राबवला गेला. अलीकडे चित्रपटांच्या माध्यमातून देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version