Site icon Aapli Baramati News

यूपी तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है.. म्हणणाऱ्या नेत्यांना शरद पवार म्हणाले..

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता इतर चार राज्यात यासाठी भाजपाने बहुमताने विजय प्राप्त केला आहे. देशातील सर्वांचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीतही भाजपाने बहुमताने विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी यूपी तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है.. अशी घोषणाबाजी केली. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता टिकेल आणि पुन्हा सत्तेत येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. शरद पवार यांना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिलेल्या  यूपी तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है.. घोषणेबद्दल विचारले असता, यासाठी महाराष्ट्र तयार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेत येईल. या निकालानंतर महाविकास आघाडीत असणारे पक्ष अधिक कष्ट घेतील. चित्र बदललेले असेल, असे शरद पवार यांनी सांगितले.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात चार राज्यांमध्ये जनादेश हा जनतेच्या भाजपच्या बाजूने आलेला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने बहुमताने विजय प्राप्त केला आहे. जनतेच्या या जनादेशाचा सन्मान आणि आदर केला पाहिजे. पुढील काळामध्ये सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत किमान समान कार्यक्रम तयार करायला हवा, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version