
बुलढाणा : प्रतिनिधी
राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली असून राज्यात सध्या भाजप आणि महाविकास आघाडी सरकार आमने सामने आले आहे. याच मुद्द्यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, आता भाजप आमदार श्वेता महाले यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
मुंबईसह शिवसेना भवनात मलिक यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्याचबरोबर शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या मलिक यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वासाठी लढले. जेव्हा शिवसेना सत्तास्थापनेसाठी काँग्रेससोबत गेली त्याच दिवशी त्यांनी हिंदुत्वाला लाथ मारली असून त्यांना आता हिंदुत्वाचा विसर पडला आहे.
जर कॉंग्रेससोबत जाणारी शिवसेना सत्तेसाठी एमआयएमसोबत गेली तर आपल्याला नवल वाटायला नको. आता केवळ शिवसेनेचे हिंदुत्व अंगावर घेण्याइतपत राहिले असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे त्यांच्या या आरोपाला शिवसेना नेते काय उत्तर देणार ते पाहणे महत्वाचे ठरेल.