Site icon Aapli Baramati News

मुख्यमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा कारवाई करुन दाखवावी; सोमय्या यांचं आव्हान

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारमधील एकेक मंत्री घोटाळ्यात सापडत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे. तरीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. त्यांनी बोलणे बंद करून कारवाई करुन दाखवावी, असे आव्हान माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. त्यांनी लुटलेला माल सरकारी तिजोरीत जमा करावा. त्यांच्याविरोधात मी तक्रार केली आहे. त्यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडून काहीतरी शिकावे. त्यांनी पहिला हप्ता म्हणून ईडीकडे तब्बल ५५ लाख रुपये भरले आहेत, असाही घणाघात किरीट सोमय्या यांनी केला. 

जनतेचाच पैसा जनतेच्या तिजोरीत गेला असून घोटाळ्यामध्ये अडकलेल्या सगळ्यांनाच हे करावे लागणार आहे. मुश्रीफ यांनादेखील हा पैसा परत करावा लागेल. याबाबत आम्ही पाठपुरावा करत राहणार आहोत असे सोमय्या यांनी नमूद केले. 

न्यायालयाने जरंडेश्वर कारखान्याबाबत निकाल दिला असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कारखान्यांच्या सभासदांमध्ये एक भ्रम पसरवत आहेत. या कारखान्यावर कारवाई झाली तरीदेखील हा कारखाना बंद पडणार नाही. हा कारखाना कधी पवार यांचा नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version