Site icon Aapli Baramati News

ताई.. माझी आई.. ऐक ना.. असं म्हणत ‘त्या’ आरोपांना उत्तर देणं किरीट सोमय्या यांनी टाळलं..?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून किरीट सोमय्या यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली होती. परंतु माध्यमांनी त्यांना काही सवाल विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले.

नवलानी आणि वाधवान यांच्याशी तुमचा संबंध काय आहे ? असा सवाल संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना केला होता. तुम्ही नवलानीला ओळखता का? असा सवाल माध्यमांनी केला असता, ताई.. माझी आई ऐक ना असे म्हणत त्यांनी उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केली. नंतर त्यांनी राऊत यांनी घेतलेल्या नावाविषयी माझा काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

त्याचबरोबर ते बोलताना पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात किती आरोप केले तर मी त्याला घाबरणार नाही. त्या बंगल्यांविषयी ठाकरे का बोलत नाहीत. सामना या मुखपत्रातून माझ्या विरोधात मोहीम चालवली असल्याचा आरोपही त्यांनी केला. मला मारायला त्यांनी शंभर माणसे पाठवली त्यातल्या फक्त चौदा लोकांना अटक झाली असून बाकीचे लोक कुठे आहेत. ठाकरेंनी मला मारायला मुंबईतले गुंड आणले असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version