Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : बारामतीत सुनेत्रावहिनी आणि सुप्रियाताईंची गळाभेट; एकमेकींना दिल्या शुभेच्छा..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

महाशिवरात्रीच्या निमित्ताने जळोची येथील काळेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांनी समोरून आलेल्या नणंद आणि लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांचे गळाभेट देऊन स्वागत केले. यावेळी नणंद भावजयीने परस्परांना शुभेच्छाही दिल्या.

सुनेत्रा पवार या आज दिवसभर विविध शिव मंदिरात दर्शनासाठी भेटी देत होत्या. या दरम्यान, संध्याकाळी त्या जळोची येथील शिवमंदिरात दर्शनासाठी आल्या. दर्शन घेऊन सौ. सुनेत्रा पवार गाभाऱ्यातून बाहेर पडत असताना समोरून खा. सुप्रिया सुळे आल्या. यावेळी दोघींनी परस्परांशी हस्तांदोलन करून गळाभेट घेतली. परस्पराना शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर मोठ्या आनंदाने सौ. सुनेत्रा पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांना निरोप दिला. खा. सुप्रिया सुळे दर्शन घेऊन गेल्यावर देखील सौ. पवार बराच वेळ तिथेच लोकांच्या गरड्यात लोकांचा फोटोचा, चिमुरड्यांवा व विशेषत: तरुणींचा सेल्फीचा हट्ट पुरवत होत्या. दरम्यान, या भेटीची व त्यातील उमदेपणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version