आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

..तर आम्हीही उत्तरप्रदेशमध्ये कार्यालय काढू : अजितदादांचं रोखठोक उत्तर

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

कार्यालय कुठे काढावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात देशभरातून लोक येत असतात. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात भवन उभारणार आहेत त्याला आमचा विरोध नाही. आम्हीही युपीत जाऊन भवन किंवा कार्यालय काढू शकतो, अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरप्रदेश सरकारच्या मुंबईतील कार्यालयाबद्दल आपली भूमिका व्यक्त केली.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत कार्यालय सुरू करण्याबाबत संकेत दिले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपले रोखठोक मत व्यक्त करत आम्हीही उत्तरप्रदेशमध्ये आमचे कार्यालय सुरू करू शकतो किंवा भवन बांधू शकतो असे म्हटले आहे.

कार्यालय कुठे सुरू करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध असण्याचे कारण नाही असेही त्यांनी नमूद केले. राजद्रोहाच्या कलमाबाबतही त्यांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलेल्या निर्णयाचे सरकारला पालन करावेच लागते. त्यामुळे राजद्रोहाच्या कलमाबाबत दिलेल्या निर्णयाचेही सरकारकडून पालन होईल असे त्यांनी सांगितले.

नाना पटोले यांचे वक्तव्य चुकीचे  

नाना पटोले यांनी जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. ते कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला, असे भाजपने म्हणावे का असा सवाल करून अजित पवार म्हणाले,  केवळ हेडलाईन बनण्यासाठी ते बोलले असावेत. जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाहीत याचीही काळजी घेतली पाहिजे.

राष्ट्रवादीचेही काही पदाधिकारी कॉँग्रेसने घेतले आहेत. १५ वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनी सरकार चालवले आहे. त्यावेळी कार्यकर्ते घेत होतो. इतर पक्षात जाऊन त्यांची ताकद वाढण्यापेक्षा एकमेकांच्या पक्षात राहतील हे पाहिले पाहिजे. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवार खुपसत नाही आणि असे कधीही बोलत नाही असेही अजित पवार म्हणाले.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us