आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

‘त्या’ मुलीला वाचवा; चित्रा वाघ यांची सरकारला भावनिक साद

राजकारण
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करत अन्य लोकांनाही बलात्कार करायला लावल्याचा गंभीर आरोप पुण्यातील शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना जामीन मिळाल्यानंतर आता त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत टीका केली आहे.

सगळे पुरावे असताना कुचीक यांना दोनवेळा जामीन मिळाला आहे. सगळ्यांसमोर येऊन त्या पीडित मुलीने घडलेली घटना सांगितली. तरीही कूचिक त्या मुलीला संदेश पाठवून केस मागे घ्यायला दबाव टाकत आहे. त्यांच्या पाठीमागचा करता करविता आणि बोलविता धनी कोण असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

या पीडित मुलीने न्याय मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे अशी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. या मुलीचे बरे वाईट झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहील असेही वाघ म्हणाल्या. ती मुलगी मेल्यावर सगळी यंत्रणा जागी होईल. तिच्या मरणाची वाट पाहत बसू नका तिला वाचवा असे भावनिक साद त्यांनी घातली आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us