आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

संजय राऊत गौप्यस्फोट करणार; शिवसेना भवनात आज पत्रकार परिषद

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर चालू असलेल्या कारवायांवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत जास्तच आक्रमक झाले आहेत. १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर मोठ्या घोटाळ्यांचे आरोप केले होते.  अशातच संजय राऊत मंगळवारी सायंकाळी ४ वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. ही माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे.

संजय राऊत यांनी या अगोदरच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे जाहीर केले होते. शिवसेना भवनात १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेतही संजय राऊत यांनी भाजप नेत्यांसह  ईडीच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे संजय राऊत उद्या ईडीबद्दल काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांवर सातत्याने आरोप करणारे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना टार्गेट करत संजय राऊत यांनी शिवसेना भवनात १५ घेतलेल्या फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले होते. गेल्या काही दिवसांमधील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत उद्या शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us